पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरु आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे’’ असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले आहे.
“अहमदनगर महामार्ग, नाशिक महामार्ग, तसेच सोलापूर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या प्रश्नासाठी मी खासदार नसतानाही गेल्या ५ वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यांनी त्याबाबत योग्य नियोजनही केले, असून वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल. ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीला सामोरे जातोय. सदैव जनतेसाठी उपलब्ध राहून जनतेची कामे करण्याची माझी गॅरंटी आहे,” असेही आढळराव पाटील म्हणाले आहेत.
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे तुमच्या प्रचारात दिसत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी आढळरावांना विचारला. यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, “आमदार महेश लांडगे दररोज माझ्या संपर्कात आहेत. त्यांचा प्रचार, बैठका दिवसरात्र सुरु असून त्यांचे सर्व सहकारी सक्रियपणे प्रचारात सहभागी होत आहेत”, असे आढळराव पाटील म्हणाले आहेत.
“सध्या उन्हाळा वाढला असला तरीही जनतेसाठी ऊन, वारा, पावसाची आम्ही कधी तमा बाळगली नाही, नेहमी लोकांसाठी धावून गेलो. हि माझी शेवटची निवडणूक आहे या आवाहनामुळे कोल्हेंना वाईट वाटले असेल किंवा ते भावून झाले असतील तर मी पुन्हा निवडणूक लढवीन.. मुळात कोल्हे यांच्यात ‘मी’ पणा दिसतोय, निवडणूक त्यांच्या हातातून निसटल्याची हि लक्षणे आहेत”, असा टोला आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव
-पाडाला पिकला आंबा!!! उन्हाळ्यात आंबा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
-“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल
-आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत
-भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला