पुणे : देशात लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातील हाय होल्टेज बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. दोन्हीही उमेदवारांनी काल गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेट हलवाई गणपतीची आरती केली. बारामती लोकसभेत विजयासाठी साकडं घातल्याचं पहायला मिळालं आहे. त्यानंतर आता आज अजित पवार हे धाराशीवच्या प्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्याला भेट दिली आहे.
अजित पवार दर्ग्यात चादर चढवली आणि प्रार्थना केल्याचं पहायला मिळालं आहे. आज अजित पवार धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हजरत ख्वाजा शमशोद्दीन यांच्या मजारावर चादर चढवली आणि प्रार्थना केली. दर्गा समितीच्यावतीने अजित दादांचा सत्कार देखील करण्यात आला. डोक्यावर टोपी आणि फुलांची चादर घेऊन अजित पवार दर्ग्यत आले. त्यांच्या सोबत राणा जागजगीतसिंह पाटील, अर्चना पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थिती होते.
महत्वाच्या बातम्या-
-गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे
-डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकारी पक्ष, बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण; येत्या १० मे रोजी निकाल
-“शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस”; बावनकुळेंची पवारांवर सडकून टीका
-Baramati Lok Sabha | ‘खडकवासल्यातून किमान १ लाख मताधिक्य अपेक्षित’ अजित पवार