पुणे : पुणे शहरातील गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डी.एस. कुलकर्णी म्हणजेच डीएसके यांच्या मुख्य कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. जंगली महाराज रोडवरील कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. शहरातील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. ईडीची दोन पथक डीएसकेच्या कार्यालयात पोहोचले असून ईडीकडीन त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. डी.एस.कें.वर ९ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीची ही रक्कम ८०० कोटींची आहे. या फसवणूक प्रकरणी डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावई यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटक झाली होती.
अंमलबजावणी संचालनालयाने आणि डीएसके यांनी या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करावे, तसेच बंगल्यातील कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. डीएसके यांनी बंगल्यातील आणि कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा ते सील करण्यात आले. या प्रकरणास दोन दिवस होत नाही, तोच ईडीच्या पथकाने पुन्हा छापे मारले आहेत. त्यामुळे डीएसके हे चांगलेच अडचणी सापडले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकारी पक्ष, बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण; येत्या १० मे रोजी निकाल
-“शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस”; बावनकुळेंची पवारांवर सडकून टीका
-Baramati Lok Sabha | ‘खडकवासल्यातून किमान १ लाख मताधिक्य अपेक्षित’ अजित पवार
Pune Lok Sabha | पुण्यात मनसे दाखवणार ताकद! महायुतीच्या प्रचारासाठी घेणार मेळावे