पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरु आहे. पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पुणे काँग्रेसकडून भाजपने प्रभू श्री रामाच्या फोटोचा वापर केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावरुन मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
“प्रभू श्रीरामांचा फोटो वापरला म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. श्रीरामाच्या अस्तित्वावरच ज्यांचा विश्वास नसणाऱ्या, अयोध्येचा निकाल निवडणूकीपूर्वी देऊ नये असे सांगणाऱ्या, ५०० वर्षांनंतर होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारणाऱ्या, प्रभू श्रीरामांचा कायमच द्वेष करणाऱ्या काँग्रेसकडून वेगळी अपेक्षा काय करणार?”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
प्रभू श्रीरामांचा फोटो वापरला म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.
श्रीरामाच्या अस्तित्वावरच ज्यांचा विश्वास नसणाऱ्या…
अयोध्येचा निकाल निवडणूकीपूर्वी देऊ नये असे सांगणाऱ्या…
५०० वर्षांनंतर होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण नाकारणाऱ्या…
प्रभू श्रीरामांचा… pic.twitter.com/jEVerGyfoM— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) April 19, 2024
पुणेकर जनतेनं काँग्रेसच्या खऱ्या रुपाचा आज अनुभव घेतला. ज्यांनी शेकडो वर्षे प्रतिक्षा केली अशा तमाम देशवासियांचा आनंदाचा विषय म्हणजे प्रभू श्रीराम. याच राम मंदिराला काँग्रेसने कायम विरोध केला. राम मंदिराचा निकाल हा निवडणुकीनंतर द्या अशी भूमिका काँग्रेसने घेतली. प्रभू रामांचा कायम द्वेष केला. प्रभू राम आमचे आहेत, आम्ही रामाचे आहोत. अशा हजार तक्रारी करा, पुणेकर हे नक्की ओळखतात की, काँग्रेस प्रभू रामांचा किती द्वेष करतात हे पुन्हा एकदा समोर आलं आहे”, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सरकारी पक्ष, बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण; येत्या १० मे रोजी निकाल
-“शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस”; बावनकुळेंची पवारांवर सडकून टीका
-Baramati Lok Sabha | ‘खडकवासल्यातून किमान १ लाख मताधिक्य अपेक्षित’ अजित पवार
Pune Lok Sabha | पुण्यात मनसे दाखवणार ताकद! महायुतीच्या प्रचारासाठी घेणार मेळावे
-होय, उन्हामुळेही हार्ट अटॅक येतो! काय काळजी घेणं आवश्यक?? जाणून घ्या