पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी झाली होती. हत्येनंतर आठ वर्षांनी खटला सुरू झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला होता. या प्रकारणाचा निकाल आता १० मे रोजी लागणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सरकार पक्ष, तसेच बचाव पक्षाकडून युक्तीवाद पूर्ण झाली आहे.
डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर जवळपास अकरा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने जून २०१४ मध्ये सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) विभागाकडे तपास सोपविण्यात आला होता.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात १५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी सुरुवातीला जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्यानंतर न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सध्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदविली.
महत्वाच्या बातम्या-
-“शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळस”; बावनकुळेंची पवारांवर सडकून टीका
-Baramati Lok Sabha | ‘खडकवासल्यातून किमान १ लाख मताधिक्य अपेक्षित’ अजित पवार
Pune Lok Sabha | पुण्यात मनसे दाखवणार ताकद! महायुतीच्या प्रचारासाठी घेणार मेळावे
-होय, उन्हामुळेही हार्ट अटॅक येतो! काय काळजी घेणं आवश्यक?? जाणून घ्या