पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण होताना दिसत आहे. ‘राम मंदिराबाबत सर्वजण बोलत आहात, पण सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, अशी नाराजी महिलांनी व्यक्त केली, असं शरद पवार म्हणाले होते. पवार यांच्या याच विधानाचा समाचार घेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे.
“राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं”, अशा तिखट शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली.
“राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत, पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात, त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल”, असा हल्लाबोलही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha | ‘खडकवासल्यातून किमान १ लाख मताधिक्य अपेक्षित’ अजित पवार
Pune Lok Sabha | पुण्यात मनसे दाखवणार ताकद! महायुतीच्या प्रचारासाठी घेणार मेळावे
-होय, उन्हामुळेही हार्ट अटॅक येतो! काय काळजी घेणं आवश्यक?? जाणून घ्या
-“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास