बारामती : खडकावासला विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघार्तग येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलताना ‘बारामती’ लोकसभा निवडणुकीच्या विजयात खडकवासला विधानसभा मतदारसंघावर भिस्त असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
“बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाने नेहमीच भाजपला साथ दिली आहे. १० वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत कमळाचे चिन्ह नसतानाही महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने या मतदारसंघातून ६५ हजारांचे मताधिक्य घेतले होते. या मतदारसंघातून यावेळी किमान १ लाख मताधिक्य अपेक्षित आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी येथून मोठे मताधिक्य मिळेल. बारामती विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य मिळेल, ते बारामतीकरच ठरवतील’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“खडकवासला विधानसभा मतदारसंघ शहरी भागात येतो. या मतदारसंघाने भाजपला सातत्याने साथ दिली आहे. गेल्या काही निवडणुकीतूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. महायुतीचा उमेदवार असल्याने ही मते निश्चित मिळतील. १० वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून ६५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी ‘घड्याळा’ला मत म्हणजे मोदींना मत हे घरोघरी पोहोचवावे लागेल”, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Pune Lok Sabha | पुण्यात मनसे दाखवणार ताकद! महायुतीच्या प्रचारासाठी घेणार मेळावे
-होय, उन्हामुळेही हार्ट अटॅक येतो! काय काळजी घेणं आवश्यक?? जाणून घ्या
-“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
-“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार