पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. आता पुणे मनसेकडून शहरात आपली ताकद दाखवली जाणार आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आज भाजप आणि मनसेच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली.
‘राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करतील आणि त्यांचे मताधिक्य वाढावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील’ अशी ग्वाही मनसेचे नेते आणि पुण लोकसभा प्रभारी बाबू वागस्कर आणि मनसे शहराध्यक्षल साईनाथ बाबर यांनी दिली आहे.
‘मनसेने महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याने निश्चितच आमची ताकद वाढली असून मुरलीधर मोहोळ हे मताधिक्याचा विक्रम करतील’ असा विश्वास वाटतो असे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले आहेत. मनसेचे कार्यकर्ते दैनंदिन प्रचारात तर सहभागी होतीलच पण स्वतंत्रपणे शहर पातळीवर आणि विधानसभा निहाय मेळावे आयोजित करण्यात येतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे. ‘मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखला जाईल आणि प्रचाराच्या नियोजनात मनसेचा सहभाग असेल’, असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा संयोजक राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले, महायुतीचे समन्वयक व प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, पुणे शहर सरचिटणीस राजेंद्र शिळमकर, रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते. तर मनसेकडून नेते राजेंद्र वागस्कर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे, योगेश खैरे प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-होय, उन्हामुळेही हार्ट अटॅक येतो! काय काळजी घेणं आवश्यक?? जाणून घ्या
-“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
-“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार