Summer Update : देशात सध्या तापमानाचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनेकांना या उन्हाचा प्रचंड त्रास जाणवत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तापमानाचा पार हा ४० किंवा चाळीशी पारही करत आहे. अनेकांना या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास झाला. बरेचजण आजारी पडले आहेत. मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाणही वाढले आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
होय, आपल्या शरीरीची आवश्यक ती काळजी न घेतल्याने उन्हाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक ठरते. हार्ट अटॅक उन्हाळ्यात येण्याची अधिक शक्यता असते. उन्हाचा थेट परिणाम हा आपल्या शरीरावर होतो. आता याबाबत डॉक्टरांनी देखील माहिती दिली आहे.
प्रचंड उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळेच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाणही वाढते. हार्ट अटॅक येण्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे तुम्हाला थकवा जाणवतो. उन्हाळ्यात थकवा लवकर जाणवतो. थकव्यामुळे थेट हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.
बऱ्याच वेळा उन्हात फिरल्याने डोकेदुखी होते. या डोकेदुखीमुळे बीपी वाढण्याची दाट शक्यता असते. जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर वाढत्या बीपीमुळेही हार्ट अटॅक येऊ शकतो.
उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणं गरजेचं आहे. अनेकांना उन्हामुळे चक्कर येते, अशावेळी देखील हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. अशा अवस्थेत दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
अधिक वेळ उन्हात राहिल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त आणि अधिक तीव्र असा हार्ट अटॅत येतो. वयस्कर लोक आणि गर्भवती महिलांनी शक्यतो उन्हात जास्त बाहेर पडू नये. दिवसातून ७ ग्लाॅस पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबू पाण्याचा देखील दररोज समावेश असावा.
महत्वाच्या बातम्या-
-“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
-“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार
-Shirur Lok Sabha | “तुमच्यामुळे मी तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक”- आढळराव पाटील