बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या शक्ती प्रदर्शनात सुळे यांच्यासह शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि काँग्रेस पुण्याचे उमेदवार रवींद्र तांगेकर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बोलताना आपण पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे
सुप्रिया सुळे यांच्यावर लाखोंचं कर्ज
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सुप्रिया सुळे यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल केलेल्या अर्जामध्ये त्यांच्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचे ५५ लाखांचे कर्ज आहे. तर यंदा शेतीचे उत्पन्न शून्य रुपये असल्याचंही शपथपत्रातील माहितीमधून समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | “तुमच्यामुळे मी तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक”- आढळराव पाटील
-“बारामती एक विकासाचं मॉडेल, हा विकास फक्त अजितदादांमुळेच”- सुनेत्रा पवार
-भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर
-Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली