पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल्याचं पहायला मिळालं. ‘ही निवडणूक पवार विरुद्ध पवार नाही तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहूल गांधी अशी आहे’, असं अजित पवार म्हणाले आहेत.
सुनेत्रा पवार या संसदेत भाषण करु शकत नाही म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “पहिल्यांदा कोणी खासदार होत असतो तेव्हा त्यांना कोणताही अनुभव नसतोच. तुम्हाला कधी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची संधी दिली तरच अनुभव येईल. अजित पवार आज तुमच्याशी बोलतोय पहिल्यांदा मलाही काहीच अनुभव नव्हता. मी दगडूशेट हलवाईला पहिलं भाषणं केलं होतं. ज्यांची पहिली वेळ असते त्यांची पाटी कोरीच असते. त्यांना अनुभव नसतो. तुम्ही संधी दिल्यानंतर अनुभव येतो”, असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांवर होणाऱ्या टीकेवर उत्तर देत त्यांची पाठराखण केल्याचं पहायला मिळालं आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवारांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली आणि विजयासाठी साकडंही घातलं आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी त्यांच्या ‘कचाकचा’ शब्दावरुन ट्रोल केलेल्यां देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार ‘कचाकचा’ शब्दावरुन झाले ट्रोल; स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी ते वक्तव्य….’
-आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा उपदेश नक्की वाचा…
-अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; पहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?
-“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल
-आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?