पुणे : उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार म्हणाले, की, “आम्ही तुम्हाला निधी देतोय, त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट दाबा. तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल”, असं म्हणाले होते. यावरुन अजित पवारांवर सर्व क्षेत्रातून टीका करण्यात येत आहे. याबाबत बोलताना अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“एका शब्दाचा उगाच बाऊ करु नये. मी ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला आहे. कार्यक्रमात मी गमतीने ते वक्तव्य केलं. त्यानंतर ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मी ते बोललो. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. या बैठकीला साधारण १५० लोक होती. सर्व लोक प्रतिष्ठित होती. त्यामुळे शब्दाचा गैरअर्थ काढू नये”, असं म्हणत अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार आज पुण्यातील सिंहगड रोडवरील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले आहे.
“चांगल्या वातावरणात पार पडाव्यात त्याकरता गणरायाचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा मोदी बसत असताना महाराष्ट्राचा त्यामध्ये मोठा वाटा पाहिजे. महाराष्ट्रातून महायुतीचे उमेदावर लोकसभेला जास्तीत जास्त निवडून यावेत, अशी प्रार्थना देवाला केली आहे. आशिर्वाद घेतला असला तरी प्रत्येकाला काम करावे लागते, फिरावे लागते. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो.”
महत्वाच्या बातम्या-
-अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; पहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?
-“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल
-आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?