पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारसभांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. शरद पवारांनी २ दिवसांपूर्वी ‘मूळचे पवार आणि बाहेरचे पवार’ या वक्तव्यावरुन राजकारणात मोठं वादंग सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“४० वर्ष एखाद्याच्या घरी येऊन ती परकी मानली जाते.. याचा विचार महिलांनी केला पाहिजे. वरिष्ठ तुम्हाला परकी म्हणत असतील तर तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” असा तिखट सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. अजित पवार आज इंदापूर येथे बोलत होते.
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी तसेच अजित पवार गटातील पदाधिकारी आणि महायुतीच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शरद पवारांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. माात्र अजित पवारांनी हा मुद्दा उचलून धरत सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना धारेवर धरलं आहे.
“इतकं करूनदेखील लोकं समोरच्या बाजूनं आहेत पण इथे खटकते. मी सगळ्यांसाठी केलं. आता तिकडे आणि विधानसभला तिकडे आहे असे सांगतात.. मला विधानसभेला लोक ढिगाने मतदान करतील, आता माझा परिवार सोडून सगळे फिरत आहेत. काल तर प्रतिभा काकी प्रचाराला आल्या ९० नंतर त्यांनी कधी प्रचार केला नाही. मीतर डोक्यावर हात मारला”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
-‘त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत’; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना टोमणा
-Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा