पुणे : मावळ लोकसभा निवडणुकीत प्रचाराला चांगलीच रंगत चढली आहे. त्यातच आता मावळच्या राजकारणात नवा ट्वीस्ट पहायला मिळाला आहे. मावळमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या प्रचारावेळी ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांनी केलेल्या वक्तव्याने मावळच्या राजकारणात वेगळा ट्विस्ट आला आहे.
संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक महत्त्वाची पदे भुषविली होती. पण आता ते ठाकरे गटाचे उमेदवार असल्याने महायुती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांची विरोधक आहे. संजोग वाघेरे यांची जुन्या पक्षाशी असलेली नाळ अद्याप तुटलेली नाही. मावळ लोकसभेच्या निवडणुकीत संजोग वाघेरे यांना या गोष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे यांनी “अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही आपल्या संपर्कात आहेत”, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मावळ लोकसभेच्या लढाईत ट्विस्ट आला आहे.
“अजित पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना भेटू नका, अशी तंबी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत. मला भेटत आहेत”, असे संजोग वाघेरे हे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत’; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना टोमणा
-Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा
-‘तुम्ही सून असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही’; अजित पवारांनी पुन्हा काकांना डिवचलं