बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा मिळवण्यासाठी मतदारसंघात सभां, मेळाव्यांचा धडाका लावला आहे. आपल्या सभा, बैठका, मेळाव्यांतून अजित पवार तळगाळातील प्रत्येकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवारांनी आज इंदापुरात डॉक्टर, व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.
“आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल” असे अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत व्यापाऱ्यांना सांगितले आहे.
🔰17-04-2024 🛣️ इंदापूर ⏱️ डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यातून लाईव्ह
https://t.co/hs7DDyBfAF— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 17, 2024
“देशामध्ये विकास करण्यासाठी पैसा लागतो. महाराष्ट्रातल्या टॅक्स माझ्या हातात आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तुम्ही पण पाळा. केंद्राचे बजेट झाल्याशिवाय राज्याचे बजेट करता येत नाही. यातून व्यापाऱ्यांना आणि सर्वांनाच फायदा होईल, मात्र फायदा कोणामुळे झाला हे विसरू नका. मला आदेश द्यायला आवडतो, मी अधिकाऱ्यांनाही आदेश देतो, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनाही आदेश देतो. आता मात्र हा कार्यकर्ता आहे याला सांभाळा, असे सांगावे लागते”, असे अजित पवार मिश्लिकपणे म्हणाले आहेत.
“काही जण भावनिक मुद्दे आणतील, मात्र भावनिकतेने आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपल्या खासदाराने आतापर्यंत कुठलं विकासकाम आणलं ते सांगा,” असा टोला त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे लोकसभेच्या मैदानात AIMIM ची एन्ट्री! तगडा उमेदवार देत काँग्रेससह धंगेकरांची डोकेदुखी वाढवली
-Shirur Lok Sabha | ‘…तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते’; मोहिते पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
-“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा
–श्री राम नवमी! रामनवमी का साजरी केली जाते? काय आहे यामागचे कारण? जाणून घ्या…