पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित कडून वसंत मोरे यांची उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आलेली आहे. आता पुण्याच्या आखाड्यात एआयएमआयएम ने देखील उडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज झाली यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुंडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंढवा भागातील माजी नगरसेवक आहेत. पालकमंत्री अजित पवार यांचे ते विश्वासू देखील मानले जातात. सुंडके यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न AIMIM च्या माध्यमातून करण्यात आला आहे. उमेदवारी जाहीर करताना ओवैसी म्हणाले “पुणे लोकसभा निवडणुकीत आमचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील हा विश्वास असून येथे निवडणूक लढण्याची मागणी सर्व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती”.
AIMIM मुळे धंगे करांची डोकेदुखी वाढली?
अनिस सूंडके यांना उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेसचा परंपरागत मतदार असणाऱ्या मुस्लिम समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. AIMIM ला मुस्लिम समाजातून मोठा पाठिंबा मिळाल्याचं गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आलेल आहे. आधीच वंचितच्या उमेदवारीमुळे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढलेली असताना आता AIMIM मुळे त्यांच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | ‘…तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नसते’; मोहिते पाटलांचा शरद पवारांवर निशाणा
-“इथं एकाला तिकीट दिलं आमदार, मंत्री केलं पण….”; शरद पवारांचा दत्ता भरणेंवर निशाणा
–श्री राम नवमी! रामनवमी का साजरी केली जाते? काय आहे यामागचे कारण? जाणून घ्या…
-हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…