shree Ram : श्री राम नवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात, मठांत यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते.
चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या पोटी श्री विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात, मठांत यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. या दिवशी घरी पूजाविधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने, माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते.
पृथ्वीवर तलावावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या रूपात अवतार घेतला. धार्मिक ग्रंथांनुसार, कलियुगात, मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो. माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून भगवान राम यांना खूप महत्व आहे.
रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते, जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. रामायण भगवान रामाची कथा सांगते, ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता. रामनवमी हा सण ५ हजार वर्षांपूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते. भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्ष्वाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती, असे म्हणतात.
श्री राम नवमीच्या दिवशी पूर्ण दिवस रवी योग साकारत आहे. या काळात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. याच दिवशी आश्लेषा नक्षत्र पूर्ण रात्रीपर्यंत आहे.
रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ आहे. तसेच ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंतची वेळही पूजनासाठी घेता येईल.
महत्वाच्या बातम्या-
-हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…
-चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून