पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तस तसा प्रचाराला रंग चढत आहे. त्यातच आता शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोपरा सभा घेण्यास सुरवात केली आहे. आढळराव पाटलांच्या सभांनाा आता नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच अण्णापूर येथे गावकऱ्यांनी आढळराव पाटलांचं जंगी स्वागत केल्याचंही पहायला मिळालं आहे.
अण्णापुर येथे झालेल्या कोपरा सभेत आढळरावांनी लोकांना विश्वासात घेत लोकांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. मला तुम्ही पाठिंबा देणारच आहात. तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चित राहा”, असे आवाहन आढळराव पाटलांकडून करण्यात आले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रामलिंग येथे भेट देऊन ग्रामदैवत रामलिंग महादेवाचे आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले. शोभाताई रसिकलाल धारीवाल सभामंडपात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना गावाचे प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावणार असे आश्वासन दिले.
कर्डेलवाडील येथे देखील आढळराव यांचे उत्स्फुर्त स्वागत झाले. यावेळी प्रवीण कर्डिले म्हणाले की, “सत्तेत नसतानाही आढळराव दादांनी आपल्या विकासकामांना हातभार लावला. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहु”, असं प्रविण कर्डिले म्हणाले आहेत. यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, “पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढून हा प्रश्न मिटवला जाईल.”
महत्वाच्या बातम्या-
-Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग
-जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज
-“ही भावकीची निवडणूक नाही, १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”- अजित पवार
-Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा