पुणे : देशात २०१४ साली पुन्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हा नरेंद्र मोदींकडून देशाच्या जनतेला पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले पण कमी झाले नाहीत. याववरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. शरद पवार मंगळवारी दौंड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
“२०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ५० दिवसांच्या आत पेट्रोलचा भाव ५० टक्के कमी करण्याचं जाहीर केलं होतं. आज त्यांची घोषणा होऊन ३ हजार ६५० दिवस झाले. २०१४ ला ७१ रुपये लिटर भाव होता. ५० टक्के कमी करतो म्हटले म्हणजे ३५ रुपये किमान व्हायला हवा होता. पण आता तो भाव १०० ते १०६ रुपये आहे. याचा अर्थ एकच आहे शब्द दिला एक आणि केलं दुसरं”, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
पेट्रोलचे भाव कमी होणार म्हणाले, त्याला ३ हजार दिवस झाले !#SharadPawar #Saheb #PetrolPriceHike #Baramati #Tutari pic.twitter.com/rIk85nF8Wb
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 16, 2024
२०१४ ला घरगुती गॅसच्या एका सिलेंडरचा दर ४१० रुपये होता, आज १ हजार १६० आहे. तसेच देशातल्या २ कोटी तरुण मुलांना रोजगार देण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. देशामधले १०० पैकी ८४ मुलं हे बेकार आहेत”, असं सांगत शरद पवारांनी नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा दाखवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Benefits of Almonds milk | बदाम दुधाचे आश्चर्यचकित फायदे; आजच बनवा आहाराचा भाग
-जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज
-“ही भावकीची निवडणूक नाही, १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”- अजित पवार
-Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा
-Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री