Milk with Almonds : दूध आपल्या शरिरासाठी फायदेशीर असते हे आपण सर्वजण जाणतो. पण बदाम आणि दूध एकत्रित पिल्याने शरीराला काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का? दुधात बदाम मिसळून पिल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. दररोज फक्त १ ग्लास दूध आणि त्यामध्ये ४-५ बदाम मिक्स करुन पिल्याने तुमचा दिवस चांगला आणि उत्साही होतो. एवढंच नव्हे ततर बदामाच्या दुधामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम असते त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत होते.
दूधामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त नसते. त्यामुळे आपण दूधात बदाम टाकून पिले तर शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि हृदय-निरोगी मोनोअन सॅच्युरेटेड फॅट्सचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दररोज हे दूध प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यासोबतच आपल्या त्वचे सौंदर्य आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते. त्वचा हायड्रेट राहते आणि पोषणही मिळते ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
बदाम आणि दूध एकत्रित प्यायल्याने काय फायदे होतात?
- ‘व्हिटॅमिन ई’चे नैसर्गिक स्रोत बदामाच्या दुधात आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहे. बदामाच्या दुधात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे ते अल्झायमरसारखे आजार कमी करते असे मानले जाते.
- बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात असलेले मॅग्नेशियम डीएनए, रक्तदाब, हाडे, प्रथिने आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते.
- बदाम हा आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो पचायला बराच वेळ लागतो. स्नॅकिंगसाठी हे एक उत्तम नट आहेत. त्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉलही कमी असते.
- बदाम दुधाचे सेवन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.
- बदामाचे दुधाचे सेवन डोळांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
-जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज
-“ही भावकीची निवडणूक नाही, १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”- अजित पवार
-Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा
-Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री
-आज भवानीमातेचा प्रकट दिन; जाणून घ्या आजच्या दिवसाचे काय महत्व?