बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करुन खासदार शरद पवारांची साथ सोडून गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आता केंद्रातील भाजपशी जुळवून घेताना दिसत आहेत. ‘आमचे नेते नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सांगतोय की, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार. आमच्या विरोधकांनी कोणी पंतप्रधान होणार हे सांगावे’, असे आव्हान अजित पवार यांनी केले आहे. बारामतीमधील तांबेनगर येथे आजी माजी सैनिकांच्या कुटुंबाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.
“मला सांगा, बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत कमी पडला आहे का? विकासाचा निधी देण्याची धमक फक्त अजित पवारांमध्ये आहे. त्यामुळे भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती उमेदवार म्हणून दिला आहे. मी सांगतो तसे तुम्ही केलं, तर बारामतीचा विकास झापाट्याने करुन दाखवतो”, असे अजित पवार म्हणाले आहे.
“केंद्राचा निधी मोठा मिळत असतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षात केंद्राचा निधीच आला नाही. १०० टक्के नोकऱ्या देणे शक्य नाही. प्रत्येकाचा काळ असतो. ही भावकीची निवडणूक नाही. भावनिक होऊन या निवडणुकीकडे बघू नका. १४० कोटी जनतेचा नेता खमक्या असला पाहिजे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“अनेक जण भेटायला येतील. जे कधी भेटले नव्हते ते सुद्धा भेटायला येतील. हे सगळे फक्त ७ तारखेपर्यंत येतील. परत आम्हाला भेटायला अजित पवारच आहे. मीच तुमची कामे करणार हे बाकीचे फक्त राजकारण करीत आहेत. यामुळे तुम्ही याबाबत सावध रहा”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Maval Lok Sabha | “बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”; संजोग वाघेरेंनी बारणेंना दिली रावणाची उपमा
-Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री
-आज भवानीमातेचा प्रकट दिन; जाणून घ्या आजच्या दिवसाचे काय महत्व?
-“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी
-अखेर शरद पवारांनी ‘त्या’ वक्तव्यावर सोडले मौन, म्हणाले “अजित पवारांचा विधानावर मी फक्त….”