भवानी माता : आज चैत्र शुद्ध अष्टमीचा दिवस आहे. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या भवानी जगदंबेचा प्रगट दिन आहे. जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व..
कोणे एकेकाळी कृत युगात दंडकारण्यात यमुनाचल पर्वतावर कर्दम नावाचे ऋषी आपली पत्नी अनुभूती सह रहात होते. अनुभुती गर्भवती असतानाच कर्दम ऋषींचा देहांत झाला. पोटात मूल असल्याने सती न जाता अनुभुती तपस्विनी म्हणून जीवन जगत होती. मुलाला जन्म देऊन ती पुन्हा तपात निमग्न झाली. तीचं अलौकिक सौंदर्य पाहून कुक्कुर नावाचा दैत्य तीला त्रास देऊ लागला. तेव्हा अनुभुती ने कळवळून आदिशक्ती जगदंबेला हाक घातली.
भक्तावरचे संकट फेडायला आई जगदंबा त्वरीत म्हणजे घाईघाई धाऊन आली म्हणून तीला त्वरिता/त्वरीजा असं नाव मिळालं याचाच अपभ्रंश झाला तुळजा ! श्रीविद्या संप्रदायात अष्टमीची नित्या म्हणजे त्वरीता म्हणजे आजच्या तिथीची देवता होय. भवानी मातेने अष्टभुजा रुपात असुरांशी युद्ध सुरू केले. कुक्कुरासुर रेड्याच्या रूपात धाऊन आला. आईने त्याचे मस्तक उडवले. रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला. जगदंबा मातेने आपल्या त्रिशुळाने त्याच्या छातीचा वेध घेतला आणि अनुभुतीला संकटमुक्त केले.
हे एवढे कार्य करून आदिशक्तीची लिला संपली नाही. रेणुका अवतारात तीने परशुरामांला वचन दिले होते की पुढच्या अवतारात तुला पुन्हा भेटेन. एव्हाना कृत युग संपून त्रेता युग सुरू झाले होते. भगवान विष्णू रघुकुळात दशरथ पुत्र श्रीराम म्हणून अवतीर्ण झाले. पितृवचनाच्या पालनासाठी प्रभू लक्ष्मण आणि जानकी सह वनवासाला निघाले. पंचवटी मुक्काम असताना रावणाने सीताहरण केले. प्रभू श्री राम सीता विरहात व्याकूळ होऊन दंडकारण्यात फिरू लागले. हे बघून भगवान शंकर देखील व्याकूळ झाले. तेव्हा जगदंबेने शंकरांना कारण विचारताच त्यांनी रामरायाची व्याकुळता सांगितली. तोच देवीने रामरायाची परिक्षा घ्यायचे ठरवले.
देवीने सीतेचं रूप घेऊन घाटशीळेवर उभी राहीली तिला उभी पाहून रामचंद्र धावत आले. सीता रुप पार्वतीला वाटले आपण जिंकलो तीने आनंदभरात डोळे मिटून घेतले. त्याच क्षणी तिला चरणांवर उष्ण ओलावा जाणवला तीने डोळे उघडून पाहताच रामराया चरणावर नतमस्तक झालेला पाहिला. देवीने पाहताच त्याने विचारले ‘तु का आली इथे?’ तेव्हा नाव प्रचलित झाले तुकाई. रामाने तिचा उद्देश जाणून म्हणले, ‘आई खरंच वेडी आहेस.’ तेव्हा नाव आले येडाई. तीच्या या रुपाला पाहून भगवान शंकर नतमस्तक झाले अशी जगाची आई म्हणजे भवाची आई म्हणून ती भवानी किंवा भव म्हणजे शंकर त्यांची स्वामिनी अर्थात भवानी.
अशी ही जगन्माता अष्टभुजा जगतजननी आई त्वरिजा भवानी अर्थात भक्तांसाठी वेडी येडाई अशी तुळजापूर वासिनी. अशा आदिशक्तीला प्रगट दिनानिमित्त शतत: अभिवादन!
महत्वाच्या बातम्या-
-“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी
-अखेर शरद पवारांनी ‘त्या’ वक्तव्यावर सोडले मौन, म्हणाले “अजित पवारांचा विधानावर मी फक्त….”
-दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस; मोसमी पावसाळ्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज
-Maval Lok Sabha | “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, समोर कोण उमेदवार..”- श्रीरंग बारणे
-डोक्यावर रखरखते ऊन तरीही सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू! धायरीत महिलांनी केलं जंगी स्वागत