शिरूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता शिरूर मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे अशी दुहेरी लढत होणार आहे. या दोन्ही उमेदवारांकडून ठिकठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहेत.
मराठी सिनेसृष्टीचे मूळचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या ५ वर्षात अनेक गावांमध्ये ते फिरकले नसल्याचा आरोप आढळराव पाटील यांच्याकडून नुकताच करण्यात आला होता. त्यातच आता अनेक गावांच्या वेशीवर “अमोलदादा, तब्बल पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत: आपलाच २०१९ चा विश्वासू मतदार” अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी लागल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे यांच्याबद्दल लागलेल्या बॅनर्सची चर्चा सर्वत्र होत असून, गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी असून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात ते कमी पडले असल्याच्या चर्चा अनेक गावांमध्ये आहे. त्याउलट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला असून नागरिकांचे प्रश्न समजून त्यांची कामे करण्याची आढळराव पाटील यांची भूमिका राहिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कोरोना काळातही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अनेक गावांमध्ये नागरिकांना मदत पुरविल्याचे अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत. आता गावांच्या वेशीवर लागलेल्या खोचक स्वागताच्या बॅनर्स बाबत आता अमोल कोल्हे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे
-एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या
-धंगेकरांना आणखी एक धक्का, काँग्रेसचे निष्ठावान आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला; नेमकं घडलं काय?
-सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; ठाकरे गटात नाराजीची लाट