पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. यावरुन आता बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी आहे. अमोल कोल्हे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांचं चांगलं नाव आहे. त्यांनी चांगलं कामही केलं आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. भाजप वैयक्तिकरित्या टीका करत आहे. पण मी राजकारणात समाजसेवा करण्यासाठी आले आहे. आमच्याकडे काही नसतानाही वैयक्तिकरित्या टीका केली जाते. वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा”, असं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती. यावर कोल्हेंनी ट्वीट करत “कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की… असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या या वादात सुप्रिया सुळे यांनी उडी घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या
-धंगेकरांना आणखी एक धक्का, काँग्रेसचे निष्ठावान आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला; नेमकं घडलं काय?
-सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; ठाकरे गटात नाराजीची लाट
-प्रत्येक संकटात परमेश्वर साथ देतोच! जीवन सुखकर बनवतील असे स्वामी समर्थांचे उपदेश