पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये सुरू असणारी वादाची मालिका कायम आहे. रवींद्र धंगेकर यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. बागुल यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र अद्यापही ते प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसलं नाही. आता धंगेकर यांची अडचण वाढवणारी बातमी पुढे आली असून बागुल यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
आबा बागुल यांना पर्वती मतदारसंघ तसेच पुणे शहरांमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. धंगेकर यांच्याकडे आधीच आमदारकी असल्याने मला लोकसभेची उमेदवारी मिळावी, असा आग्रह बागुल यांनी धरला होता. मात्र तरीही पक्ष नेतृत्वाने रवींद्र धंगेकर यांच्या पारड्यात लोकसभा उमेदवारीचे माप टाकले. त्यामुळे बागुल यांनी थेट काँग्रेस भवनात मुक आंदोलन केल्याचं देखील पहायला मिळाल. आता बागुलांच्या फडणवीस भेटीने आम्ही सर्व मिळून रवींद्र धंगेकरांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, अशा वल्गना करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजूनही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीपासून नाराज असलेले आबा बागुल यांनी आपली नाराजी काँग्रेस भवन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मुख्य निदर्शने करून दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत बैठकांना आबा बागुल यांनी दांडी मारली होती. आता आबा बागुल यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठीच वृत्त आहे.
पर्वती मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तसेच भाजपचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे लोकसभा निवडणूक समन्वयक श्रीनाथ भीमाले यांचीही ताकद मोठी आहे. आता त्याला जोड आबा बागुलांची मिळाली तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर यांची ताकद पर्वती मतदार संघात वाढून मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ आहे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; ठाकरे गटात नाराजीची लाट
-प्रत्येक संकटात परमेश्वर साथ देतोच! जीवन सुखकर बनवतील असे स्वामी समर्थांचे उपदेश
-“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ