पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या सुसंस्कृत व्यक्तीमत्व दाखवल्याचं पहायला मिळालं आहे. खासदार अमोल कोल्हे रविवारी भोसरी विधानसभा मतदारसंघातील इंद्रायणीनगर भागात गावभेट दौऱ्यावर होते. त्यावेळी निओ रिगल सोसायटीत मतदारांना भेटत असताना उत्साहात स्वागत करण्यात आले.
अमोल कोल्हे यांच्या स्वागतानंतर संबंधित सोसायटीतील रहिवाशी आपले मनोगत व्यक्त करत होते. त्याचवेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खदखद व्यक्त करत असताना या ज्येष्ठ नागरिकाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलची नारीज तीव्र शब्दात व्यक्त करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातील कडवटपणा लक्षात आली की लगेच कोल्हे यांनी तत्काळ त्यांना थांबवलं आणि माईक आपल्या हातात घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
अलीकडच्या काळात राजकारणाचा स्तर घसरत चालला असला तरी आपण आपला स्तर घसरू द्यायचा नाही, हीच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, स्व. बाळासाहेब ठाकरे , स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन, स्व. विलासराव देशमुख यांच्या पासून ते आदरणीय शरद पवार… pic.twitter.com/0zLq5KGCd4
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 15, 2024
राष्ट्रवादी फुटीनंतर “शरद पवार यांची साथ सोडून गेलेल्यां नेत्यांमुळे सर्वानाच मनस्ताप झाला, हे खरं असलं तरी टीका करताना आपण आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही. समोरून राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर घसरू द्यायचा नाही”, असे म्हणत कोल्हे यांनी जोडून आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रत्येक संकटात परमेश्वर साथ देतोच! जीवन सुखकर बनवतील असे स्वामी समर्थांचे उपदेश
-“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ
-देशात पुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री; गेल्या तीन महिन्यात १ लाखांपेक्षा जास्त घरे विक्री