पुणे : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. ‘उद्धव ठाकरे हे वेडे असून ते आमच्या सुपाऱ्या दहशतवाद्यांना देत होते’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. नारायण राणेंच्या या वक्तव्यावर आता शिवसेनाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या मावळमध्ये महविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी देहूरोडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
“नारायण राणे मानसिकरित्या आजारी आहेत. आजारी माणसं तापात बडबडतात. त्यामुळे त्यांचा बोलणं मनावर घेऊ नये. माझ्या भाच्यांनीदेखील प्रचारातून थोडा वेळ काढून नारायण राणेंना एका चांगल्या डॉक्टरांना उपचारासाठी दाखवावं”, असं सुषमा अंधारे म्हणाले आहेत.
“आजारामुळे राणेंच्या मेंदूवर परिणाम झालेला असू शकतो. १० वर्ष ज्या काँग्रेसच्या घरात धुणीभांडी करून पद मिळवली त्याचा विसर राणेंना पडला आहे. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशा त्यांना शुभेच्छा,” असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा
-“सून म्हणून माझी निवड शरद पवारांनीच केली”; शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया