पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘अब की बार गोळीबार सरकार’ असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केल्याचं पहायला मिळालं. सुप्रिया सुळेंनी पुण्यातील गुंडगिरीवरुनही सरकारला धारेवर धरलं. त्यावर आता पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.
“सुप्रियाताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण मी ताईंना आठवण करून देतो, जेव्हा त्यांची राज्यात आणि देशात सत्ता होती तेव्हा त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांवर गोळीबार केला, शेतकऱ्यांचा जीव घेतला. तसं तरी आम्ही काही केलेलं नाही. बोलायला गेलो तर खूप काही निघेल. परंतु, आम्ही वैयक्तिक बोलत नाही.”
“शेतकऱ्यांवर गोळीबार झाला तेव्हा पालकमंत्री हे अजित पवार होते. त्यामुळे मोहोळ यांनी अजितदादांना प्रश्न विचारावा”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन पुणे शहरात राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आधी अश्रू अनावर अन् आज थेट जोडले हात; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांचं मौन कायम
-“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत होणार ‘हे’ बदल