पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेचा बारामती मतदारसंघात पवार विरद्ध पवार अशी लढत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी ‘पवार आडनाव पाहून मत द्या’, असं म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना खासदार शरद पवार म्हणाले की, ‘दोन गोष्टी असतात, एक मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार’.
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन अप्रत्यक्षपणे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यावर आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली पाटील यांनी याबाबत गुरुवारी फेसबुक पोस्टही लिहली आहे.
“ज्या पवार साहेबांनी महिला धोरण राबवलं, महिला सक्षमीकरणाची धोरणं त्यांनी केली. त्याच पवारसाहेबांनी हे वक्तव्य केल्याचे धक्कादायक आहे. ज्यांनी जन्म दिला त्यांच घर सोडून त्यांच्या घरात जायचं त्यांच्या घराण्याचा कूळ वाढवायचा, शेवटचा श्वासही त्यांच्या घरात घ्यायचं तरीही त्याच घरातील मोठी व्यक्ती म्हणत असेल तुम्ही मूळ पवार बाहेरचा पवार हे त्या महिलेचा अपमान झाल्यासारखं आहे.”, असंही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
शरद पवार काय म्हणाले होते?
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत होणार ‘हे’ बदल
-सुनेत्रा पवारांची प्रचारसभा घेणार का? राज ठाकरे म्हणाले, ‘मी महायुतीच्या …’
-सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”
-अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाबाबत विचारताच सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर