पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला गुढीपाडवा मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखर आणि खंबीर नेतृत्वसाठी आपण बिनशर्त पाठिंब जाहीर करत आहोत, अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. त्यानंतर आता आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली असून सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार का? अस प्रश्न विचारला असता त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे. मात्र कुठे प्रचारसभा घ्यायची कुठे नाही ते अजून ठरवलेलं नाही. मतदान आलं की मैदानं बुक केली जातात. त्यामुळे सभा होतातच आता त्याबाबत काय करायचं ते पाहू.”
“भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क करायचा, कुणाशी बोलायचं? याची यादी २ दिवसात तयार होईल आणि ती यादी त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल. कुठलाही घोळ व्हायला नको म्हणून ही यादी तयार करण्यात येणार आहे” असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”
-अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाबाबत विचारताच सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
-“नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला लोकसभा मतदारसंघ
-आढाळराव पाटलांना भोसरीतून एक लाखांचे मताधिक्य देणार; महायुतीच्या मेळाव्यात महेश लांडगे यांचा हुंकार
-बारामती, शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू; ७ मे रोजी होणार मतदान