पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहरात तापमानाचा पारा चाळीशी पार करत होता. वाढत्या उन्हामुळे शहरात दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. येत्या २ दिवस शहरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना या उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात गेल्या २ दिवसांपासून दमट वातावरण असून साधारण तापमान ३९ अंश इतके आहे. मे महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. साधारण तापमान ४३ अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मे महिन्यात पुणेकरांना उन्हाच्या झळा जाणवू शकतात.
‘अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वारे गुजरातमार्गे महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत आहेत, त्यामुळे शहराला सध्या दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेड होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. काळजी न घेतल्यास हे वातावरण आरोग्यास घातक ठरू शकते. जेव्हा कमाल तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस असते तेव्हा उष्णतेची लाट असल्याचे म्हटले जाते. पुण्यात सध्या तरी तशी लाट नाही, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”
-Baramati Lok Sabha | ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार…’; अजितदादांना काकांचं खुमासदार शैलीत
-शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका