पुणे : “कोरोनाच्या काळामध्ये अमाच्यासारखे कार्यकर्ते रस्त्यावर काम करत होते, परंतु राज्यांमध्ये काही लोक केवळ फेसबुक लाईव्ह करत राहिले. आज तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, परंतु मोदींनी वक्रदृष्टी केली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना फेस येईल. यांनी दवाखाना, ऑक्सिजन प्लांट यामध्ये देखील भ्रष्टाचार केला” अशी खरमरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आयोजित पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराकरीता आज पुण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली. यावेळी बोलताना शिंदे यांनी पुणे लोकसभेत भाऊ, तात्या कोणी नाही तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, असा विश्वासही व्यक्त केला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, मुरलीधर मोहोळ आणि महायुतीचे सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते निवडणुकीसाठी चार्ज झाले आहेत. महायुतीचं वातावरण राज्यभर असून आपली मोठी ताकद आहे. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेना भाजपची नैसर्गिक युती आहे. मध्यंतरी यामध्ये काही विघ्न आली परंतु बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या मनातली युती पुन्हा राज्यांमध्ये आणली. काही लोक सरकार स्थापन झाल्यापासून पडणार पडणार असे म्हणत होते परंतु काही झालं नाही. आता राज ठाकरे आपल्या सोबत आले आहेत. देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम, तसेच राज्यांमध्ये सुरू असणारे विकासाचे काम पाहून अजितदादा देखील आमच्या सोबत आले.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Skin Care Tips: वाढत्या उन्हामुळे त्वचेवर टॅनिग झालंय! करा ‘हे’ घरगुती उपाय
-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा