Summer Skin Care : राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. या वाढत्या उन्हामुळे आरोग्यावर तर परिणाम होतोच पण त्वचेवरही त्याचा चांगलाच परिणाम होत असतो. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी, काळपट पडते. यावर आपण घरगुती उपाय करु शकतो.
चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय
- टोमॅटोमध्ये एंटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर ठरतो. अर्ध कापलेलं टोमॅटो आणि मुलतानी माती आणि चंदन पावडर मिक्स करुन चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करावे. चेहरा अत्यंत मऊ होतो.
- लिंबामध्ये व्हिटामीन सी ची मात्रा मुबलक असते म्हणून<त्याचबरोबर मधामध्ये त्वचा मुलायम होण्यास मोठी मदत होते. मध, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करुन हीच पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार होते.
- लिंबाच्या रसामुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी ३ चमचे लिंबाच्या रसामध्ये २ चमचे बेकिंग सोडा मिक्स करावे, हा लेप चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावे, थोड्या वेळात चेहरा नॉर्मल पाण्याने धुवावा.
- दही त्वचेला मॉश्चराईज करते. दह्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. आठवड्यातून २ ते ३ वेळा दही आणि हळद मिक्स करुन चेहऱ्याला लावल्याने चकाकी येते.
- हळद आणि बेसनाच्या पॅकने घरच्या घरी त्वचेची टॅनिंग सहज काढता येते. यासाठी अर्धा चमचा हळद, एक चमचा गुलाबपाणी आणि दूध दोन चमचे बेसन मिसळून घ्या. आता टॅनिंग त्वचेला पाण्याने चांगले धुवा आणि पेस्ट लावा. १० मिनिटांनंतर त्वचा धुवून स्वच्छ करा. आपला चेहरा मऊ, सुंदर आणि गोरा दिसू लागेल.
- उन्हाळ्यात चेहऱ्याला कोरफडीचा गर लावल्याने चेहरा थंड राहण्यास मदत होते. कोरफडीचा गर हा त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्वचा जळजळणे, कोरडी पडणे, हा त्रास वारंवार जाणवत असले तर कोरफडीचा गर आणि गुलाबपाण्याने चेहऱ्यावर हलका मसाज केल्याने त्वचेचा दाह कमी होतो.
महत्वाच्या बातम्या-
-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; एबीव्हीपीकडून आंदोलनाचा इशारा
-पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले