पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. प्रचारसभा, रॅलीसारखे कार्यक्रम देशभरात सुरु आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तसेच सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर मतदानबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमही राबवण्यात येत आहेत. अशातच पुण्यातील प्रतिष्ठित गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’ लिहिण्यात आलं आहे. या प्रकारामुळे काही विद्यार्थी संघटनामध्ये संतापाटी लाट उसलळी आहे.
पुण्यातील गोखले संस्थेतील इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लब यांच्यातर्फे वॉल ऑफ डेमोक्रेसी तयार करण्यात आली होती. या भिंतीवर एक फलक लावून त्यावर मतदारासंदर्भात जनजागृती केली होती. त्यावर सह्यासाठीदेखील जागा ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग यांचे लोगो लावण्यात आले.
या फलकावर थेट ‘नोटा’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’, असं लिहिण्यात आल्याचं समोर आलं. सुरुवातीला हा प्रकार कोणी केला आहे. याचा थानपत्ता लागला नाही मात्र काही वेळाने सीसीटीव्ही तपासून ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार केला त्या दोन विद्यार्थ्यांना संस्थेने ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इन्कलाब झिंदाबाद घोषणेमागून लोकशाहीची हत्या करणारे नेमके कोण आहेत? या पोस्टची छेड-छाड करणाऱ्यां विरोधात जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले