पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिली आहे. महायुतीने मोहोळांच्या प्रचारात कोणतीच कसर सोडली नाही. कंबर कसून मोहोळांचा प्रचार सुरु आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मैदानात उतरले आहेत. आज पुण्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील सर्व कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री शिंदे संवाद साधणार आहेत. पुण्यातील या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार दणक्यात सुरु आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी उपस्थित राहताना दिसत आहे. त्यातच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोहोळ यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग दाखवला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोहोळांचा प्रचार करताना दिसणार आहेत.
भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक घरी पोहचत आहेत. प्रत्येक संस्थांना देखील गाठीभेटी घेतल्या जात आहेत. भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘हर घर मोदी परिवार’ हे अभियान राबण्यात आले. मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचे १० हजार कार्यकर्त्यांद्वारे मतदारसंघातील १० लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कर’ पोहवण्यात आला आहे. या दरम्यान घरोघरी मिळालेला पुणेकरांचा प्रतिसाद हा भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना
-“त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते तुमचा काय विकास करणार?”; अजित पवारांचा खोचक सवाल