पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बुधवारी भोर तालुक्याता दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील चिखलावडे गावातील शेतकरी महिला, पुरुषांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे वन्य प्राण्यांकडून होणारा त्रास कळकळीने सांगितला. यावर सुनेत्रा पवारांनी त्यांना मोठ्या कष्टाने, घाम गाळून शेतात रुजवलेले, जोपासलेले पीक क्षणात होत्याचे नव्हते करण्याचे काम होत आहे. याबाबत वन्य विभाग आणि अन्य पातळीवर उपाययोजना करन्यासाठी नक्की प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.
चिखलावडे खुर्द या गावात सुनेत्रा पवारांचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि ‘वहिनी तुम्हीच खासदार होणार बघा.’ असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील नाझरे गावात सुनेत्रा पवारांनी वेगळा प्रसंग अनुभवल्याचं पहायला मिळालं. नाझऱ्यातील महिलांशी संवाद साधताना महिला म्हणाल्या, “खास तुम्हाला भेटायला सगळी काम सोडून आम्ही साऱ्याजणी आलो आहे. पेपरात, टिव्हीत तुम्हाला पाहताना तुम्ही आम्हाला आमच्याच वाटता” असेही काही महिला म्हणाल्या. या ठिकाणी झालेल्या भाषणांमध्ये स्थानिकांनी, झालेला विकास हा महायुतीच्या माध्यमातूनच झाला असल्याचे सांगून हे गाव घड्याळालाच मताधिक्य देईल अशी ग्वाही त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिली.
शंभूतीर्थ, पान्हवळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या ठिकाणी विशेषतः महिला भगिनींचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पवार यांना विशेष भावला. स्थानिकांसह विविध पदाधिकारी मनोगत व्यक्त करत असताना उपस्थित माता-भगिनींपैकी एक चंद्रभागा कोंढाळकर यांनी तर स्वतःहून पुढे येऊन माइक हाती घेतला. आणि जोशात म्हणाल्या की, “तुम्ही माझ्या लेकी सारख्या आहात. पण तुम्हाला सगळेच वहिनी म्हणतात म्हणून मीही म्हणते. वहिनी, आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमचा विजय घोषित झालेला आहे.”
महत्वाच्या बातम्या-
-“आम्ही फक्त कांद्याला हमीभाव मागितला तर आम्हाला निलंबित, ही दडपशाही आता चालणार नाही”- सुप्रिया सुळे
-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळात मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धरला शिंदेंचा हात