पुणे : पुणे विद्येचं माहेरघरं आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. या निमित्ताने पुण्यातील फुले वाड्यामध्ये अनोख्या पद्धतीने फुले जयंती साजरी करण्यात येत आहे. फुले वाड्यात तब्बल १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली आहे.
महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या मिसळचे वाटप केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही फुले वाड्यात महात्मा फुलेंना अभिवादन केले आणि मिसळचा आस्वादही घेतल्याचं पहायला मिळाले आहे.
पुणेकरांनी नेहमीच नवा आदर्श समाजापुढे मांडला आणि तोच इतरांसाठी आदर्श ठरत असतो. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी पुणेकरांनी हटके अभिवादन केले आहे. यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या-वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल १० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे.
लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत ही मिसळ तयार करण्यात आली आहे. साधारण रात्रीपासूनच ही मिसळ तयार करायला सुरुवात करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या-
-“आम्ही फक्त कांद्याला हमीभाव मागितला तर आम्हाला निलंबित, ही दडपशाही आता चालणार नाही”- सुप्रिया सुळे
-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळात मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धरला शिंदेंचा हात
-“फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे…”, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री अमृता खानविलकर