पुणे (प्रतिनिधी) : भाजपकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केल्यानंतर संपूर्ण यंत्रणा प्रचाराच्या कामाला लागली आहे. स्वतः मोहोळ यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला असून शहरातील विविध समाज संघटना, विविध क्षेत्रातील नामवंत, पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. मोहोळ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यादेखील प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहेत. माजी नगरसेविका राहिलेल्या मोनिका मोहोळ यांना पालिका सभागृहात काम करण्याचा अनुभव असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण सक्रिय होत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या साथीने भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोनिका मोहोळ यांनी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मान्यवर, आजीमाजी नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली. गेल्या पंधरा दिवसात त्यांनी मतदारसंघात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठी दरम्यान शक्य झाले तिथे त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याही घऱी जाऊन त्यांना भेटत आहेत. निवडणूक प्रचार याबद्दल कार्यकर्त्यांची मत त्यांनी जाणून घेतली.
या आपल्या पहिल्या प्रचार फेरीबद्दल मोनिका मोहोळ यांनी सांगितले की, ‘मी महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे. यात महापालिकेत अनेक सहकारी नगरसेवकांशी नव्याने ओळख झाल्या, मैत्रीही झाली. या पाच वर्षात मला समाजकारण आणि लोकांची कामे करण्याचे स्वातंत्र्य देत मुरलीधरआण्णांनी मला एकप्रकारे प्रशिक्षणच दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुढे कधीतरी सहभागी व्हावेच लागणार होते, मग सुरूवातीपासूनच का आपण यात सहभागी होऊ नये ! म्हणून या अनुभवाच्या जोरावरच मी सुरूवातीपासूनच प्रचारात सक्रिय होण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे स्वतंत्रपणे भेटीगाठी घेतल्या.
‘मला जवळपास पाच निवडणुकींचा अनुभव असून तो अनुभव आज महत्त्वाचा ठरत आहे. भेटीगाठींमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनसामान्यांच्या विश्वासाची साक्ष पदोपदी मिळत आहे. मी जवळपास सहाही विधानसभा मतदारसंघात जाऊन आले आहे. यापुढेही पक्षाच्या वतीने जसे नियोजन केले असेल तसे प्रचारात आपण सहभागी होणार असल्याचेही मोनिका यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळात मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धरला शिंदेंचा हात
-“फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे…”, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री अमृता खानविलकर
-राज ठाकरेंनी मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा; त्यावर वसंत मोरे म्हणाले,….
-भाजपमध्ये प्रवेशासाठी तुम्ही दिल्लीत पिंगा घातला! अतुल बेनकेंनी घेतला अमोल कोल्हेंचा समाचार