पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मतदारसंघातील प्रचार थांबवण्यात आला असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. धंगेकरांच्या प्रचार थांबवल्या बाबतच्या सूचना ठाकरे गटाचे प्रमुख सचिन आहिर यांनी दिल्या असल्याचं बोललं जात होतं. मावळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे यांचे काम काँग्रेसकडून केले जात नाही म्हणून धंगेकरांचा प्रचार थांबवल्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. पण यावर आता सचिन अहिर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“रवींद्र धंगेकर हे आता जरी काँग्रेसवासी झाले असले तरी ते मूळचे शिवसैनिक असून ते पूर्वी शिवसेनेतच होते. कसबा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोठ्या प्रमाणात ताकद लावली म्हणून धंगेकर निवडणूक जिंकले आहेत आणि हे त्यांनी देखील मान्य केले आहे,” असं सचिन अहिर म्हणाले आहेत.
“रवींद्र धंगेकर यांच्याबाबत वैयक्तिक असा द्वेष नाही. त्यांना गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला शिवसेनेची मोठी ताकद मिळत आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये सांगली तसेच इतर जागेचा तिढा सुटत नसल्याने काही काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला वरिष्ठांनी अद्याप काम करण्याच्या सूचना दिल्या नसल्याचे सांगत होते. असाच प्रकार मावळमध्ये देखील होत होता”, असं देखील सचिन आहिर म्हणाले आहेत.
“धंगेकरांच्या प्रत्येक बैठकीला सेनेचे पदाधिकारी उपस्थित असतात. तसेच आजच्याही बैठकीलाही उपस्थित होते. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे शहर प्रमुखांनी देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या”, असं सचिन अहिर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळात मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धरला शिंदेंचा हात
-“फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे…”, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री अमृता खानविलकर
-राज ठाकरेंनी मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा; त्यावर वसंत मोरे म्हणाले,….
-भाजपमध्ये प्रवेशासाठी तुम्ही दिल्लीत पिंगा घातला! अतुल बेनकेंनी घेतला अमोल कोल्हेंचा समाचार