पुणे : राज्यातील चर्चेच्या मतदारसंघापैकी मावळ लोकसभा मतदारसंघात दररोज नवनविन राजकीय घडामोडी घडत असतात. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. श्रीरंग बारणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.
मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. मात्र, प्रचारादरम्यान मतदार संघात रंगत बघायला मिळते आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ‘उबाठा’ला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीरंग बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केल्याचे पहायला मिळाले.
‘ठाकरे’ गटाचे मावळ उपतालुका प्रमुख आणि माजी सरपंच चंद्रकांत भोते, ओव्हळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, उबाठा शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी येथील संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केल्याचं आता समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे…”, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री अमृता खानविलकर
-राज ठाकरेंनी मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा; त्यावर वसंत मोरे म्हणाले,….
-भाजपमध्ये प्रवेशासाठी तुम्ही दिल्लीत पिंगा घातला! अतुल बेनकेंनी घेतला अमोल कोल्हेंचा समाचार
-“महायुतीच्या विजयात भोर तालुक्याची मोलाची भूमिका”; सुनेत्रा पवार भोरच्या दौऱ्यावर