पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंच्या मोदींना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पक्ष सोडल्यापासून मी कोणाचाही विचार केला नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही”, असं म्हणत वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर कोणतंही उत्तर देणं टाळलं आहे. मोरे आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
“शहराचा विकास करणं अशक्य नाही. धंगेकरांनी विकास केला असेल तर लोक त्यांना नक्की मतदान करेल. मी ६ही विधानसभा मतदार संघाचा सगळा अभ्यास केला आहे. मी खासदार झालो की, संपूर्ण शहराचा विकास करणार आहे. विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं”, असंही मोरे म्हणाले आहेत.
“कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. भाजपचं चारशे पाच स्वप्न स्वप्नच राहणार आहे. माझा फॉर्मुला ३० तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मी शंभर टक्के पुण्यातून आघाडी घेणार आहे,” असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपमध्ये प्रवेशासाठी तुम्ही दिल्लीत पिंगा घातला! अतुल बेनकेंनी घेतला अमोल कोल्हेंचा समाचार
-“महायुतीच्या विजयात भोर तालुक्याची मोलाची भूमिका”; सुनेत्रा पवार भोरच्या दौऱ्यावर
-महापालिका इन अॅक्शनमोड: शहरातील नाले, गटारे सफाई १० मे पर्यंतच करावीत, पालिका आयुक्तांच्या सूचना
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा