श्री स्वामी समर्थ : श्री दत्त दिगंबराचे आवतार मानले जाणारे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. ठिकठिकाणी प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री स्वामी महाराजांचे असंख्य भक्त मनोभावे आराधना करतात. स्वामींचा कृपाशिर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव असावा म्हणून सर्व भाविक स्वामी महाराजांची सेवा मनोभावे करताना दिसतात.
स्वामी समर्थ महाराज कसे प्रकटले?
निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. एका शेतकऱ्याची कुऱ्हाड झाड तोडताना एका वारुळावर पडली. त्या वारुळातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच तिथे दिव्य प्रकाश पडला. उद्धव या शेतकऱ्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. आता तिच मूर्ती श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणून नावारुपाला आली आहे.
इसवी सन १८५६ ते १८७८ म्हणजेच १९ व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी ‘नृसिंह सरस्वती’ म्हणून देखील ओळखले जाते, तर काही ठिकाणी त्यांना ‘चंचल भारती’ आणि ‘दिगंबर स्वामी’ म्हणूनही ओळखले जाते.
श्रीपाद वल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते. तेथून ते आसे तुहिमाचलास गेल्याचं पौराणिक कथांमध्ये म्हंटल जातं.
‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’, हे श्री स्वामी महाराजांचे ब्रीदवाक्य आहे. या एका वाक्याने सर्व स्वामी भक्तांना अडचणीच्या प्रसंगात कितीही संकटे आली तरीही मोठा दिलासा मिळतो. स्वामी महाराज आपली पाठराखण करतात, ते आपल्याला जगण्याचे बळ देतात, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी श्रद्धा स्वामी भक्तांची आहे. स्वामी महाराजांचे विचार आपले जीवन बदलून टाकतात.
आपल्या मनात सतत वाईट, नकारात्मक विचार येत असतील, सतत मन दु:खी राहत असेल, तर स्वामी महाराजांचे काही विचार आपण सारखे वाचले पाहिजेत. त्यांच्या या विचारांनी आपले मन प्रसन्न, विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी या विचारांचा नक्कीच आधार मिळतो.
उदास असाल तर स्वामींचे नाव घ्या,
दु:खी असाल तर स्वामींचे ध्यान घ्या,
मार्ग भेटत नसेल तर स्वामींचे विचार घ्या,
एवाढ्याने देखील समाधानी नसाल तर… अक्कलकोटची वाट घ्या….
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. मात्र, ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरु नका…
स्वामी महाराजांना आपल्या भक्तांची काळजीच नाही तर आपल्यावर प्रेमही आहे. आणि म्हणूनच स्वामी महाराज हे आपल्याला मार्ग दाखवायला सदैव तत्पर असतात… फक्त एकदाच स्वामींना हाक मारा…
लक्षात ठेवा स्वामींचे नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही, कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही…
कोणी तुमचे काही ऐकून घेत नसेल, तर स्वामींना सांगा
महाराजांमधून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे,
ते त्याच्यापर्यंत नक्की पोहचेल…
विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असेल तर,
मागे हटू नका, ठाम राहा आणि ते कृतीत आणाटटट
जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा
कारण स्थिर मनातच स्वामी महाराजांते प्रतिबिंब दिसेल…
तुम्हाला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसतील किंवा निर्णय घेता येत नसतील, तर डोळे बंद करुन स्वामींचे ध्यान कर, अशाने तुम्हाला स्वामींशी संवाद साधता येईल.
तुम्हाला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दु:ख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…
टीप : आम्ही वरील सर्व माहिती केवळ माहिती म्हणूनच वाचकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही मुद्द्यावर दावा करत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-“महायुतीच्या विजयात भोर तालुक्याची मोलाची भूमिका”; सुनेत्रा पवार भोरच्या दौऱ्यावर
-महापालिका इन अॅक्शनमोड: शहरातील नाले, गटारे सफाई १० मे पर्यंतच करावीत, पालिका आयुक्तांच्या सूचना
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना