पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचा शहरात चांगलाच बोलबाला सुरु आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी भाजपचे शहरातील सर्वच जण पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. शहरातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींच्या घरोघरी जात भेटीगाठी घेत आहेत. सामान्य जनता यात मागे पडू नये याकडेही भाजपच चांगलंच लक्ष आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार ग्राऊंड लेव्हलवर जितका जोमाने सुरु आहे, तितकाच सोशल मीडियावरही वेळोवेळी अपडेट देत किंवा रिल्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नव्या तंत्राचा योग्य वापर करुन रिल्सच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ हे प्रत्येक तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. तगडं सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत मोहोळांचा प्रचार सुरु आहे.
भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘हर घर मोदी परिवार’ हे अभियान राबण्यात आले. मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचे १० हजार कार्यकर्त्यांद्वारे मतदारसंघातील १० लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कर’ पोहवण्यात आला. या दरम्यान घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.
View this post on Instagram
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी या सगळ्यांनी मोहोळांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. या अभियानाअंतर्गत आज सकाळी सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर १० हजार कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन अडीच लाख कुटुंबातील १० लाख मतदारांशी संवाद साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना
-“त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते तुमचा काय विकास करणार?”; अजित पवारांचा खोचक सवाल
-‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा