बारामती : महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केल्याचं पहायला मिळालं. तसेच त्यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहनही केले आहे.
“मी दमदाटी करतो असा माझ्यावर आरोप केला जातो, पण मी कधीच दम दिला नाही. ज्यांच्यावर माझा हक्क आहे, त्यांच्याकडे मी काही मागितले, विनंती केली तर त्याला दम म्हणता येणार नाही. आज तुम्हाला जे भावनिक करत आहेत, त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते काय तुमचा विकास करू शकणार?” असा सवाल अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना नाव न घेता केला आहे.
“जास्त नाही पण पुढची किमान दहा वर्षे तरी मी तुमचं काम खंबीरपणे करू शकतो, त्यामुळे कोणाला साथ द्यायची याचा निर्णय बारामतीकरांनी करायचा आहे. या निवडणुकीत तुम्ही मला साथ दिली नाही तर मीही तुम्हाला साथ देणार नाही, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. कारण एवढे करून जर पालथ्या घडयावर पाणी असेल तर त्याचा काही उपयोग नाही” अजित पवारांच्या या वाक्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजितदादा’ अशा घोषणा दिल्याचं पहायला मिळालं आहे.
“मी पक्ष चोरला असा माझ्यावर आरोप केला जातो, पण मी पक्ष चोरला नाही. पुढच्या पिढीने पक्षाचे काम हातात घेतले याचा अर्थ त्यांनी पक्ष चोरला असा होत नाही. आम्हीही पक्षासाठी योगदान दिलेले आहे, आज ८० टक्के आमदार माझ्यासोबत येतात, आमच्या विचाराची भूमिका घेतात, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी योग्य घडत असेल, म्हणूनच ते आमदार येतात ना? सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर असे दरवेळेस कसे चालेल?” असा सवालही अजित पवारांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा
-पुणेकरांच्या नळाला कोरड; महापालिकेकडे ४ दिवसांत ४०० तक्रारी
-जान्हवी कपूरचा सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल; सिद्धिविनायक मंदिरात पोहचली अनवानी
-‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी