पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज मराठी नववर्ष, गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात दर्शन घेतले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज शहरातील ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. अशा गर्दीत मुरलीधर मोहोळ यांनी थेट दर्शन न घेता सर्वसामान्य नागरिकांसोबत रांगेत उभं राहून दर्शन घेतले. यातून त्यांचा हाच साधेपणा अनेकांना भावून गेला.
महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी शहरात आपल्या प्रचाराला जोषात सुरूवातही करून दिली आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
आज पाडव्यामुळे मंदिरात मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यावेळी मुरलीधर मोहोळ हे सर्व भाविकांसोबत इतकी गर्दी असतानाही यांनी रांगेत उभे राहिल्याचं पहायला मिळालं. मुरलीधर मोहोळांचा हा साधेपणा पाहून मंदिरातील सर्व भाविक आणि पुणेकर भारावून गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा
-पुणेकरांच्या नळाला कोरड; महापालिकेकडे ४ दिवसांत ४०० तक्रारी
-जान्हवी कपूरचा सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत व्हिडीओ व्हायरल; सिद्धिविनायक मंदिरात पोहचली अनवानी
-‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी