Janhvi Kapoor : दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लाडकी कन्या जान्हवी कपूर हिने देखील काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जान्हवी शिखरच्या आईसोबत सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्याचं पहायला मिळालं आहे.
शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आणि स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि आहे. नुकतंच जान्हवीला स्मृती यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात गेल्याचं पहायला मिळालं. स्मृती शिंदे आणि जान्हवी कपूर या दोघींचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
गुढीपाडवानिमित्त जान्हवी सकाळी अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात गेली होती. यावेळी ती शिखरच्या आईचा हात पकडून चालत होती. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांच्या निर्मितीचा ‘मैदान’ हा चित्रपट येत्या ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वडिलांच्या चित्रपटाला यश मिळण्यासाठी आणि नववर्षानिमित्त बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी जान्हवीने सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट परिधान केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी
-अजित पवारांकडून दुभंगलेली मनं जोडण्याचा प्रयत्न; ‘जनसंवाद सभे’चे आयोजन
-पाणी देण्यासाठी धमकावलं! शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार
-ऐनवेळच्या ठरावाची माहिती का लपवली जाते?; ‘आप’ची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार, केली ‘ही’ मागणी