पुणे : पुणे शहरातील औंध परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. समोस्यामध्ये बटाट्याऐवजी कंडोम, दगड, तंबाखू किळसवाणा निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडला असल्याचं समोर आला आहे. हा प्रकार पाहून अनेक सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही कंपनी आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकमेकांचा काटा काढण्यासाठी हा किळसवाणा प्रकार काही माथेफिरुंनी घडवून आणला आहे.
आरोपी फिरोज आणि विक्की हे दोघेही एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत. एसआरए एंटरप्रायझेसच्या तिघांनी मनोहर एंटरप्रायजेसने पुरविलेल्या समोसामध्ये भेसळ करायला सांगितले होतं. काही काळापूर्वी ऑटो फर्मच्या कॅन्टीनला कंत्राट एसआरए एंटरप्रायजेसकडे होते, मात्र त्यांचा करार रद्द करण्यात आला. त्यानंतर त्या कंपनीने पुरवलेल्या जेवणात पट्टी आढळून आली होती. दुसऱ्या कंपनीची बदनामी करून कंत्राट रद्द करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला. रहीम शेख, अजहर शेख आणि मजहर शेख अशी एसआरए एंटरप्रायझेसच्या पार्टनरची नावं आहेत.
कॅटालिस्ट सर्विस सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे ऑटोमोबाईल कंपनीला जेवण पुरवण्याचं काम दिलं होतं. कॅन्टीनचं जुनं कॉन्ट्रॅक्ट रद्द करुन ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देण्यात आलं. त्यामुळे कॅन्टीन चालकाने हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. आधी SRS एंटरप्राइजेज नावाच्या कंपनीला समोसे तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यानंतर काही कारणामुळे हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आणि दुसऱ्याला दिलं. याचाच काटा काढण्यासाठी मालक रहीम शेख याने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी रहीम शेख, अझर शेख, मझर शेख, फिरोज शेख ऊर्फ मंटु आणि विकी शेख या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांकडून दुभंगलेली मनं जोडण्याचा प्रयत्न; ‘जनसंवाद सभे’चे आयोजन
-पाणी देण्यासाठी धमकावलं! शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचा जोरदार पलटवार
-ऐनवेळच्या ठरावाची माहिती का लपवली जाते?; ‘आप’ची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार, केली ‘ही’ मागणी
-“नातं हे नात्याच्या जवळ ठीक, पण अजितदादा एखादी भूमिका घेतात तेंव्हा…” सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या
-भोसरीत आढळरावांच्या पाठीशी लांडगे अन् लांडेंची ताकद! विलास लांडेंच्या भेटीनंतर आढळरावांचे पारडे जड