पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना धमकावण्यावरुन फटकारलं होतं. शरद पवारांनी सोमवारी बारामती मतदारसंघातील दुष्काळी भागाची पाहणी केली. या दरम्यान सुप्यात झालेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता सुनावलं आहे.
‘तुमच्या दमदाटीला घाबरु नका’, असं म्हणत ठणकावलं होतं. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरुन अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. दौऱ्याआधीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
“पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते, तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीनेच चालवायची असते. राजकारण करताना राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते, जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलिस त्या बाबतची कार्यवाही करतील.”
महत्वाच्या बातम्या-
-ऐनवेळच्या ठरावाची माहिती का लपवली जाते?; ‘आप’ची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार, केली ‘ही’ मागणी
-“नातं हे नात्याच्या जवळ ठीक, पण अजितदादा एखादी भूमिका घेतात तेंव्हा…” सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या
-भोसरीत आढळरावांच्या पाठीशी लांडगे अन् लांडेंची ताकद! विलास लांडेंच्या भेटीनंतर आढळरावांचे पारडे जड
-लोकसभेच्या लगीनघाईत व्हायरल झाली ‘ती‘ पत्रिका! पुण्याच्या राजकारणात जोरदार चर्चा