पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. यानिवडणुकीवरून अजितदादांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्याची तर सुप्रिया सुळे यांना स्वत: अस्तित्व टिकवून ठेवण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. यावरूनच सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
एका बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार तर दुसऱ्या बाजूला अजितदादा सारखे नेतृत्व आहे त्यामुळे या निवडणुकीत तुम्हाला दडपण वाटतं का? असा प्रश्न केला असता सुमित्रा पवार म्हणाल्या, “सुरूवातीपासूनच ही राजकीय लढाई असल्याची आम्ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नात्याचं राजकारण आणणं एक प्रकारे चुकीचं आहे. लोकसभा निवडणूक ही फार मोठी आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या जवळ तर नातं हे नात्याच्या जवळ ठेवलं तर चांगलं होईल.”
दरम्यान, अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जात आपलं राजकारण मर्यादित केलं असल्याचं तुम्हाला वाटतं आहे का ? त्यावर त्या म्हणाल्या की, मला असं वाटत नाही की असं काही आहे. परंतु अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात. त्यावेळी ते पुर्ण विचारकरूनच भूमिका घेतात. त्यामुळे अजितदादांच्या विचारांसोबत आम्ही सर्व जण सोबत आहोत.
महत्वाच्या बातम्या-
-भोसरीत आढळरावांच्या पाठीशी लांडगे अन् लांडेंची ताकद! विलास लांडेंच्या भेटीनंतर आढळरावांचे पारडे जड
-लोकसभेच्या लगीनघाईत व्हायरल झाली ‘ती‘ पत्रिका! पुण्याच्या राजकारणात जोरदार चर्चा
-मोदींच्या विकासाच्या कामावर नागरिकांना विश्वास, पुणेकरांची मन आम्ही जिंकली आहेत – मोहोळ