पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरु आहे. त्यातच महायुतीमध्ये नाराजी दिसून येत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या मेळाव्यामध्ये मानापमानचे नाट्या झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र पहायला मिळालं. रिपब्लिकन पक्षाचे आठववले गटाच्या शहराध्यक्षांना व्यासपीठावर बसायला जागा दिली नाही नामोल्लेख केला नाही म्हणून त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेतला. आठवले गटाने तर श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नसल्याचाही इशारा दिला. या सर्व नाट्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट महायुतीच्या नाराज, आक्रमकांना चांगलेच खडसावले आहे.
“मेळाव्यात नकारात्मक कोणीही बोलायचे नाही. केवळ सकारात्मक सूचना करायच्या, नकारात्मक बोलणाऱ्यांनी जेवण करावे आणि बाहेर पडावे. नकारात्मक बोलणार असाल तर सभागृहाबाहेर जावे”, अशी तंबी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे कार्यकर्ते चकित झाले. नकारात्मक बोलणाऱ्यांकडे माईक दिला जात नव्हता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काळेवाडीत झालेल्या मेळाव्याला आण्णा बनसोडे यांची अनुपस्थिती होती. बनसोडे यांनी राष्ट्रवादीला मतदारसंघ सोडण्याची मागणी केली होती. ‘पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास ते विजयी होतील’ असा दावा बनसोडेंनी केला होता. पण, महायुतीमध्ये मावळची जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी बनसोडे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेच्या लगीनघाईत व्हायरल झाली ‘ती‘ पत्रिका! पुण्याच्या राजकारणात जोरदार चर्चा
-मोदींच्या विकासाच्या कामावर नागरिकांना विश्वास, पुणेकरांची मन आम्ही जिंकली आहेत – मोहोळ
-‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर